Site icon सक्रिय न्यूज

क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती केज तालुका कार्यकारिणी जाहीर…..!

केज दि.३ – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यासाठी जयंती उत्सव समितीच्या वतीने रूपरेषा ठरवण्यासाठी मंगळवारी (दि.२ एप्रिल) रोजी सायंकाळी ७.३० वाजता केज शहरातील संत शिरोमणी श्री.सावता माळी मंदिरात  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जयंती उत्सव समिती कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.
              सदरील बैठकीसाठी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, नितीन सत्वधर, चिंतामण सत्वधर, भारत सत्वधर, दिनकर राऊत, सचिन रोडे, ऍड.नितीन चिंचोलकर, गणेश सत्वधर, सोमा सत्वधर, अशोक सत्वधर, अक्षय सत्वधर, सज्जन सत्वधर यांच्यासह फुलेप्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे विचार रुजवण्यासाठी एक आगळीवेगळी जयंती साजरी करण्याचे ठरवण्यात आले. दि.११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार असून शहरातील मेन रोड, मंगळवार पेठ इत्यादी भागातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर मिरवणुकीचे विसर्जन श्री.संत सावता माळी मंदिरात होईल.
       सदरील बैठकीत अध्यक्ष म्हणून  अशोक दत्तात्रय सत्वधर, उपाध्यक्ष सचिन रोडे, सचिव गणेश सत्वधर, सहसचिव नवनाथ पांडुरंग राऊत यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी नंदकुमार सत्वधर, संतोष ससाणे, किशोर आगरकर, वैष्णव आगरकर, कुमार मोहन राऊत यांची तर मार्गदर्शक हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, चिंतामण सत्वधर, दिनकर राऊत, भारत सत्वधर हे राहणार आहेत.
           दरम्यान, जयंतीच्या माध्यमातून क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटित होणे गरजेचे असून शहरासह तालुक्यातील नागरीकांनी मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version