Site icon सक्रिय न्यूज

बीड लोकसभेची राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर….!

Breaking news logo. Flat illustration of breaking news vector logo for web design

बीड दि.४ – लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून बीड लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनीही शरद पवारांकडे जोर लावला होता त्यामुळे बीडमधून ज्योती मेटे उमेदवार असतील की बजरंग सोनवणे याची प्रतीक्षा होती. मात्र अखेर बीडचा तिढा सुटला असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार म्हणून पक्षामध्ये नव्यानेच प्रवेश केलेले बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बीड लोकसभेमध्ये आता भाजपाच्या पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी होणार की ज्योती मेटे ह्याही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने तिरंगी होणार हे पाहावे लागणार आहे.

शेअर करा
Exit mobile version