केज दि.२० – मागच्या एक वर्षांपूर्वी केज शहरातील हनुमान ज्वेलर्स च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बक्षीस योजनेची सोडत काढण्यात आली आणि यामध्ये ज्ञानेश्वर गोपीनाथ पारसेवार हे भाग्यवान ग्राहक ठरले. पारसेवर यांना बक्षीस म्हणून मोटारसायकल मिळाली आहे.
हनुमान ज्वेलर्सच्या वतीने एका वर्षाच्या कालावधीमध्ये 3400 रुपयांच्या सोने खरेदीवर एक कुपन दिल्या गेले. आणि त्या कुपनांमधून भाग्यवान ग्राहक ठरेल त्याला दुचाकी बक्षीस म्हणून ठेवण्यात आली होती. सदरील योजनेला एक वर्ष झाल्यानंतर 15 ऑगस्ट 2024 रोजी हनुमान ज्वेलर्स येथे सदरील बक्षीस योजनेची सोडत इस्कॉन मंदिर बीडचे अध्यक्ष विठ्ठलानंद दास यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. आणि यामध्ये ज्ञानेश्वर गोपीनाथ पारसेवार हे भाग्यवान विजेते ठरले. हनुमान ज्वेलर्स च्या वतीने नेहमीच ग्राहकांचे हित लक्षात घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवल्या जातात. त्यामध्ये मागच्या कांही वर्षांपर्यंत दहा हजार रुपयांची पैठणी ठेवण्यात येत होती, तर त्यानंतर मोबाईल ही बक्षीस म्हणून ठेवण्यात आले होते. आणि या योजनांना ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने यावेळी दुचाकी बक्षीस म्हणून ठेवण्यात आली होती. ज्या ग्राहकाला दुचाकी लागली त्यांना हनुमान ज्वेलर्स येथे दुचाकीची चावी तर दिलीच मात्र त्यांचा सत्कार ही करण्यात आला.