बीड दि.13 – जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे चित्र निर्माण झाले असताना पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री उशिरा गोळीबारची घटना घडली आहे. यात एक जण गंभीर जखमी झाल्याचे कळते.
अक्षय आठवले याने प्रकाश आंबेडकर नगर भागात रात्री उशिरा गोळीबार केला. यात एक जण गंभीर जखमी झाला असून पेठ बीड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक यांनी कायद्याचा धाक निर्माण केला होता. मात्र मागच्या काही घटना पाहता खाकीची भीती आता संपत चालल्याचे चित्र जिल्हाभरात पाहायल मिळत आहे.
दरम्यान गोळीबार करणारा आठवले हा एका आमदारांचा निकटवर्तीय असून त्याच्यावर यापूर्वी ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.