आपला जिल्हाब्रेकिंग

बीडमध्ये प्लायवूड च्या दुकानात स्फोट, एकाचा मृत्यू, दोघे जखमी………!

बीड दि.१८ – शहरातील जिजामाता चौकातील एका प्ल्यायवुडच्या गोडाऊनमध्ये केमिकल कॅनचा भीषण स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१८) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.या भीषण घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.
           अनिरुद्ध संजयराव पांचाळ (वय-३०) यांचा या स्फोटात जागीच मृत्यु झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.बीड शहरातील चंपावती प्ल्यायवुडच्या गोडाऊनमध्ये केमिकल कॅनचा अचानक भीषण स्फोट झाला.यात अनिरुद्ध पांचाळ यांचा जागीच मृत्यु झाला असून स्फोटच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला होता.दरम्यान घटनास्थळी शहर पोलीस आणि श्वान पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close