केज दि.२५ – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पञकार संघाची केज तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पञकार संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर उपाध्यक्षपदी प्रदीप गायकवाड यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकरिणीमध्ये सचिव पदी विजय बिक्कड, सहसचिव पदी आप्पा सारूक, कार्याध्यक्षपदी नंदुलाल मिसाळ, कोषाध्यक्षपदी विवेक बनसोड, प्रसिद्धी प्रमुख पदी पांडुरंग कसबे, डिजिटल मीडिया अध्यक्षपदी विश्वास राऊत, पत्रकार विरोधी हल्ला समिती अध्यक्षपदी सचिन साखरे तर कायदेविषयक सल्लागार पदी ॲड.सतीश मस्के यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीला पत्रकारांच्या हित संबंधासाठी काम करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे. सदरील निवड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शेख आयेशा (संपादक लोकजगत) यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन विवेक बनसोडे यांनी मानले. नुतन पदाधिकारी यांचे स्वागत महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी यांनी केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.