Site icon सक्रिय न्यूज

स्पर्धा परिक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला पाहिजे – डॉ.ओमकार गिते….!

स्पर्धा परिक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला पाहिजे – डॉ.ओमकार गिते….!
केज दि.२४ –  समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर शिक्षणाचा स्तर वाढला पाहिजे. या अनुषंगाने धोतरा (ता.केज) गावामध्ये १० वी, १२ वी तसेच इतर स्पर्धा परीक्षा मध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.    यावेळी मार्गदर्शक म्हणून गावातील विद्यार्थी डॉ. ओमकार सत्यप्रेम गिते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
          सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून वसंत केदार, प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार मोराळे, भगवान केदार, मुख्याध्यापक चांगदेव हंगे यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना प्रोसाहन मिळावे तसेच स्पर्धा परीक्षाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवा या करीता गावच्या परिसरात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या Visionary Engineers या कंपनी कडून इंजि. मनोज तांबडे यांनी गावच्या जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी स्पर्धा परीक्षा साठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य उपल्ब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे .
               कार्यक्रमाचे आयोजन गावातील सरपंच बाजीराव गीते यांच्यासह गावातील तरुणांनी केले होते. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते , पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक शंकर तारळकर यांनी केले.
शेअर करा
Exit mobile version