Site icon सक्रिय न्यूज

स्वातंत्र्यदिनी ठरणार बुलेटचा भाग्यवान विजेता….!

स्वातंत्र्यदिनी ठरणार बुलेटचा भाग्यवान विजेता….!

केज दि.१४ –  शहरातील नामवंत असलेल्या हनुमान ज्वेलर्सने सोने खरेदीदारांसाठी एक कुपन योजना सुरू केली होती. आणि त्या कुपन योजनेची सोडत 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी होणार असून यामध्ये ठरणार आहे बुलेट जिंकणारा भाग्यवान विजेता.

          शहरातील हनुमान ज्वेलर्स नेहमीच ग्राहकांचे हित लक्षात घेऊन विविध उपक्रम राबवत असतात. त्याच अनुषंगाने मागच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये जे सोने खरेदी करतील त्यांच्यासाठी कुपन योजना सुरू केली होती. योजनेतून बुलेट ही दुचाकी ग्राहकांना मिळणार आहे. सदरील कार्यक्रम 15 ऑगस्ट 2025 रोजी सराफा लाईनला असलेल्या हनुमान ज्वेलर्स येथे पार पडणार आहे. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इस्कॉन मंदिर बीड चे अध्यक्ष विठ्ठलानंद प्रभू हे राहणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठ्ठलानंद प्रभू यांचे कीर्तन होईल आणि त्यानंतर सव्वा अकरा वाजता कुपणची सोडत होणार आहे.
              दरम्यान ज्या ग्राहकांनी सोने खरेदी करून कुपन घेतलेले आहे अशा सर्व ग्राहकांनी कुपन सोडत कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन हनुमान ज्वेलर्सच्या वतीने हेमंत दिलीप रुद्रवार यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version