Site icon सक्रिय न्यूज

पुढील 10 ते 20 वर्षे मोदींना पर्याय नाही -बाबा रामदेव

नवी दिल्ली – योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य केलं आहे. पुढील 10 ते 20 वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नसल्याचं रामदेव बाबा म्हणालेत.

रामदेव बाबा यांच्या सांगण्यानुसार, “मी नरेंद्र मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे पुढची 10 ते 20 वर्षे त्यांना काही पर्याय नाहीये.”

रामदे बाबा पुढे म्हणाले, कोट्यावधी लोकांना पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक आहे. मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे जे काही करायचं आहे ते देशासाठी करायचंय हे आता सगळ्या देशाला हे ठाऊक आहे.”

दरम्यान काँग्रेसला टोला लगावताना राहुल गांधी यांनी त्रियोग करावा तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा असंही रामदेव बाबा म्हणालेत.

शेअर करा
Exit mobile version