पुणे दि.२१ – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रूपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी, शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी मी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर अज्ञाताविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणीही रूपाली पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने रविवारपासून रुपाली पाटील ठोंबरे सातारा दौऱ्यावर आहेत. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.