राजकीय

पदवीधर उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी…….!

 पुणे दि.२१ – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रूपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

                 दरम्यान धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी, शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी मी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर अज्ञाताविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणीही रूपाली पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने रविवारपासून रुपाली पाटील ठोंबरे सातारा दौऱ्यावर आहेत. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

शेअर करा
Tags

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close