पुणे दि.२३ – पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माझ्यावर टीका केलेली कशी चालते?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.शरद पवारांचा अनादर करायचा नव्हता. त्यांना मी नेहमीच आदराने बोलतो. माझ्या वक्तव्याचा संदर्भ समजून घ्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आम्हाला चंपा, टरबुजा बोललेलं कसं चालतं? पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केलेली कशी चालते?, मी सामान्य माणूस आहे तर मग माझ्यावर टीका कशाला करता? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मी अनेकदा टीका करतो. पण त्यावर ते कधी बोलत नाहीत. मी रात गई बात गई, अशा पद्धतीने वागणारा माणूस आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.