पुणे दि.28 – पुणेकरांनी बनवलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे बोलत होत्या.
जग फिरल्यावर शेवटी आमच्या पुण्यातच लस सापडणार आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे, नाही तर कोणीतरी म्हणायचं मीच शोधली, असा टोला सुप्रिया सुळेंनी मोदींना लगावला आहे.
दरम्यान, आज या सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. सुरुवातीला म्हणत होते सात दिवस टिकेल, सात महिने टिकेल, आता तर वर्ष झालं. आता पुढची पाच वर्षेचं नव्हे तर 25 वर्ष कधी उलटतील हे कळणार सुद्धा नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.