Site icon सक्रिय न्यूज

नेकनूर वरून कांदा घेवून जाणार्‍या टेम्पोचा तुळजापूर जवळ अपघात, तीन ठार

बीड दि. 16 – कांदा घेून निघालेल्या टेम्पोचे टायर फुटल्याने टेम्पो डिवायडरवर धडकला. या अपघातात चालकासह दोन शेतकरी ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना रात्री दोन वाजता तुळजापूरच्या घाटात घडली.
                 नेकनूर, निवडूंगवाडी,   गवळवाडी येथील तीन शेतकर्‍यांनी आपला कांदा एकत्रित करून तो सोलापूरच्या बाजाराला टेम्पो (क्र. एम.एच. १६ ए.ई. ७७०४) यामध्ये घेऊन जात होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास टेम्पोचे टायर फुटल्याने टेम्पो तुळजापूरच्या घाटात डिवायडरवर जोरात धडकला. यात चालक शेख सज्जाद सकलेन (वय ४०, रा. नेकनूर) देवराव धोंडीराम शिंदे (वय ५५ रा. गवळवाडी नेकनूर), मोहन भगवान मुंडे (वय ४५, रा. निवडूंगवाडी)हे तिघे ठार झाले तर भागवत शिवाजी मुंडे (वय ४०, रा. निवडूंगवाडी) हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उस्मानाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती नेकनूर आणि निवडूंगवाडी येथील नागरिकांना झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
         सदरील घटनेची नोंद तुळजापूर पोलिसात झाली असून पुढील तपास पीएसआय चनशेट्टी हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version