#Accident

नेकनूर – मांजरसुंभा दरम्यान कार – दुचाकी अपघात…..!

13 / 100
बीड दि. 24 – नेकनूर-मांजरसुंबा रोडवरील सफेपूर फाट्यानजिक गुरुवारी (दि. २३) रात्रीच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून कारमधील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
            सतीष रामराव गायकवाड (४०), तानाजी गोरख गायकवाड (३४ दोघे रा. मस्साजोग, ता. केज) अशी मयताची नावे आहेत. हे दोघे दुचाकीवर जात होते. त्यांच्या दुचाकीला भरधाव आलेल्या कारने जोराची धडक दिली. गंभीररित्या जखमी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील शेख मुनी (वय ३५), शेख मन्साक (वय २२ रा. नेकनूर) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा……

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close