बीड दि.23 – माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मंगळवारी (दि.22) रोजी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरीला गेले आहे. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.