Omicron

पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉन ची बाधा……!

8 / 100

मुंबई दि.१ – राज्याच्या माजी मंत्री तथा भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांना कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हायरसची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या जिनोम सिक्वेन्सींग मधून हा प्रकार समोर आल्याची पुष्ठी त्यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची बाधा झाल्याची स्वत: अजित पवारांनी जाहीर केल्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या संदर्भाने देखील वृत्त समोर आले आहे. पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. सध्या त्यांना मुंबईच्या घरातच होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आपली प्रकृती उत्तम असून लोकांनी काळजी करु नये केवळ संपर्कात आलेल्यांनी काही लक्षणे जानवल्यास तपासण्या करुन घ्याव्यात असे आवाहन पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close