Site icon सक्रिय न्यूज

घराच्या बांधकामावरून दोन गटात हाणामारी……! 

घराच्या बांधकामावरून दोन गटात हाणामारी……! 
केज दि.५ – घराच्या बांधकामावरून दोन गटात लोखंडी गजाने आणि काठीने हाणामारी झाली असून एकाचे डोके फुटले. तर दोघे जखमी झाले असून ही घटना केज तालुक्यातील काळेगावघाट येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात दोन्ही गटाच्या सात जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
        काळेगावघाट येथील कृष्णा मोतीराम धिवार ( वय ४८ ) यांचे गावात बांधकाम सुरू असून ते गल्लीच्या रस्त्यावर बांधकाम करीत असल्याचा प्रश्न उपस्थित करून शरद दत्तात्रय धिवार यांनी बांधकाम आडविले. त्यावरून ४ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास कृष्णा धिवार, अविनाश धिवार, मोतीराम धिवार यांनी तू बांधकाम कसा आडवतोस असे म्हणत शरद धिवार यांना शिवीगाळ करीत लोखंडी गजाने व लाथाबुक्याने मारहाण करीत डाव्या कानाच्या पाठीमागे मारुन दुखापत केली. तर पाठीवर, हातावर मारुन मुकामार देत पुन्हा नादी लागलास तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. तसेच शरद धिवार, अमोल धिवार, दत्तात्रय धिवार यांनी तू गल्लीच्या रस्तावर बांधकाम का करतोस असे म्हणत कृष्णा धिवार यांना शिवीगाळ करीत काठीने कपाळावर, हातावर, पाठीवर मारुन मुकामार दिला. लाथाबुक्याने मारहाण करीत तु जर आमचे नादी लागल्यास तर तुझे कुटुंबाला जिवेच मरुन टाकु अशी धमकी दिली. तसेच कृष्णा यांचा भाऊ मध्ये आल्याने त्याला लोखंडी गजाने मारून डोके फोडले. शरद धिवार यांच्या फिर्यादीवरून कृष्णा धिवार, अविनाश धिवार, मोतीराम धिवार यांच्याविरुद्ध तर कृष्णा धिवार यांच्या फिर्यादीवरून शरद धिवार, अमोल धिवार, दत्तात्रय धिवार यांच्याविरुद्ध केज पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. बिट जमादार अमोल गायकवाड, पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version