क्राइम

दोन गटात तुंबळ हाणामारी, दोघांचे डोके फुटले…..!

6 / 100
केज दि.२ – शेतातील पेरणीवरून दोन गटात दगडाने व लोखंडी गजाने झालेल्या हाणामारीत दोघांचे डोके फुटल्याची घटना ढाकेफळ ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात दोन्ही गटाच्या सात जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
       ढाकेफळ येथील सतीश भुजंगराव थोरात ( वय ४० ) यांनी १ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता त्यांचे शेजारी शेतकरी श्रीधर शाहुराव थोरात यांना माझ्या शेतातील तीन काकऱ्या का पेरल्या अशी विचारणा केली असता श्रीधर थोरात, शाहुराव थोरात, भगवान थोरात या तिघा बापलेकांनी शिवीगाळ करीत दगडाने डोक्यात मारून डोके फोडले. तर लोखंडी गजाने व लाथाबुक्यांनी मारहाण करीत मुक्कामार दिला. अशी फिर्याद सतीश थोरात यांनी दिल्यावरून वरील तिघा बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
      दुसऱ्या गटाचे शाहुराव भाऊराव थोरात ( वय ७५ ) हे १ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता  शेतात पेरणी करीत असताना त्यांचे शेजारी शेतकरी सतिष भुजंग थोरात, अशोक भुजंग थोरात, भुजंग भाऊराव थोरात, बाबासाहेब भुजंग थोरात या चौघा बापलेकांनी शिवीगाळ करीत त्यांना दगडाने पायावर व पाठीत मारहाण केली. तर त्यांचा मुलगा श्रीधर थोरात हा भांडण सोडवण्यास आला असता त्याला अशोक थोरात व बाबासाहेब थोरात यांनी अडवुन त्याच्या डोक्यात दगड मारून डोके फोडले. लाथाबुक्या ब चापटाने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद शाहुराव थोरात यांनी दिल्यावरून वरील चौघा बापलेकांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक संपत शेंडगे व डोंगरे हे तपास करताहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close