Site icon सक्रिय न्यूज

शेतीचा बांध कोरणाऱ्याकडून जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी……!

शेतीचा बांध कोरणाऱ्याकडून जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी……!
 केज दि.१८ – शेतातील बांध का कोरला अशी विचारणा केल्याच्या कारणावरून महाराष्ट्र परिवर्तन सेनेच्या अध्यक्षास जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
      केज तालुक्यातील मांगवडगाव शिवारातील सर्वे नं. २३३/१ मध्ये महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे अध्यक्ष धनराज विठ्ठल थोरात यांची शेती आहे. त्यांचे शेजारी आरोपी सतीश भैरु कसाब ( रा. कळंब जि. उस्मानाबाद ) याने शेतीचा बांध कोरल्याचे निदर्शनास त्यांच्या आले. त्यावरून १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता धनराज थोरात यांनी बांध का कोरला ? अशी विचारणा केली असता सतीश कसाब याने जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार धनराज थोरात यांनी युसुफवडगाव पोलिसात दिली होती. त्यांच्या तक्रारीची चौकशी पूर्ण करून १८ एप्रिल रोजी पोलिसांनी धनराज थोरात यांची फिर्याद नोंदवून घेतली आहे. थोरात यांच्या फिर्यादीवरून सतीश कसाब याच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात कलम ५०४, ५०६ भादविसह कलम ३ ( १) ( एस ) अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version