केज दि.१५ – केज पोलीस ठाण्याचे पीआय प्रदीप त्रिभुवन यांची बदली झाली असून केजला कोणते पीआय रुजू होतात याची उत्सुकता तालुक्याला लागली आहे.
मागच्या दिड वर्षांपासून केज पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळणारे पीआय प्रदीप त्रिभुवन यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली असून ते बुलडाणा जिल्ह्यात रुजू होणार आहेत. जिल्ह्यात सेवेचा विहित कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सदरील बदली करण्यात आली असून त्रिभुवन यांनी केज पोलीस ठाण्यात दिड वर्षे सेवा बजावली.