हवामान
केज शहर परिसरात जोरदार पाऊस…..!

केज दि.1 – मागच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यातून आणखी कुणीच सावरले नसताना पुन्हा चार दिवसांच्या विश्रांतीनंतर वरूनराजने जोरदार पुनरागमन करत केज शहर परिसराला झोडपून काढले.
शुक्रवारी रात्री 8 च्या दरम्यान अचानक विजा चमकू लागल्या.मेघागर्जनाही जोरात झाली आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. कांही कळण्याच्या आताच सुमारे 45 मिनिटे धो धो पाऊस बरसला.
दरम्यान आता पाऊस शांत झाला असे वाटले होते. परंतु पुन्हा आज दमदार कोसळल्याने आणखी किती नुकसान पाहावे लागणार आहे……वरूनराजाच जाणो……!