मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा…..!
मुंबई दि.3 – गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे अद्याप पावसाचा धोका कमी झाला नसल्याचं दिसून येत आहे. हवामान खात्याकडून पुढील काही दिवस महत्वाचे असल्याचं सांगितलं आहे.
बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यासह अनेक जिल्ह्यांना मध्येही पाऊस कोसळणार आहे. आज औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांत अलर्ट दिला आहे.