क्राइम

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, केज पोलीसांत गुन्हा दाखल……!

केज दि.४ – तालुक्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या भावकितील नराधमाने शेतात नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
                    केज तालुक्यातील एका गावात एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच भावकितील नराधमाने, तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणुन त्याच्या शेतामध्ये नेऊन तिच्या सोबत वारंवार बलात्कार केला. त्यातून ती अल्पवयीन पीडित मुलगी पाच महिण्याची गरोदर राहिली आहे. दि. ४ ऑक्टोबर रोजी पीडित मुलीने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबा वरून तिच्या भावकितील नराधमाच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात भा द वी 376 ( 376 (एन) ३७६ (एफ) यासह अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (पोक्सो कलम ४ व ६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
               सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी आणि रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close