आपला जिल्हा

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका टळलेला नाही……!

बीड, दि. 7 – यावर्षी दि. 7 ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान नवरात्र, दुर्गापुजा दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरील लाट ओसरली असली तरी आजुनही कोरोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी मोठया प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. नवरात्र उत्सव साजरा करतांना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातुन योग्य ती खबरदारी अत्यावश्यक आहे. त्यानुषंगाने राज्य शासनाने संदर्भिय परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केलेल्या असून बीड जिल्हयासाठी पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत.
               कोविड- 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, अपत्ती व्यवस्थापन मदत पुर्नसवन विभागाचे आदेशान्वये ब्रेक द चैन अंतर्गत दिलेल्या सुधारित मागर्दशक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक नवरात्र उत्सवासाठी मंडळानी स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेलया संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि नगर परिषद, नगरपंचायत तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोर यांच्याश सुसंगत असे मर्यादेत स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा नवरात्र उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्यानुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची 2 फुटाच्या मर्यादित असावी. मागील वर्षीप्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्ती ऐवजी घरातील धातु संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे, मुर्ती शाडुची पर्यावरणपुरक असल्यास तिचे विसर्जन घरच्या घरी करावे विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्या संदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
                     नवरात्र उत्सवाकरिता वर्गणी देणगी स्वच्छने दिल्यास त्याचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पंसती देण्यात यावी तसेच माझे कुंटुंब माझी जबादारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गर्भा दांडिया व इत्तर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करु नये त्याऐवजी आरोग्य विषयक उपकरणे शिबीरे उदाहरनार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कारोना, मलेरिया, डेग्यू इत्यादी आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट आणि फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करुन देण्यातची जास्तीत जास्त व्यवस्था करावी. देवीच्या मंडपामध्ये प्रत्येक्ष येऊन दर्शन घेणा-या भाविकांच्याबाबतीत शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आदेश
                 कार्यालयाचे आदेश दि. 5 आक्टोबर 2021 अन्वये ब्रेकद चेन अतंर्गत दिलल्या सुधारित मार्गदर्शक सूचनाच्या सोबत असलेल्या Annexure A मधील SOP प्रमाणित सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरती, भाजन, किर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषण संदर्भातील नियमांचे व तरतुदीचे पालन करण्यात यावे. मंडपामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी.
                         तसेच मंडपामध्ये पेय पानाची व्यवस्थाकरणे सक्त मनाई आहे. देवीचे आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लाहन मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील इमारतीमधील सर्व घरगुती देवीच्या मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. नगर, पालीका, नगर पंचायत, विविध मंडळे, गृह निर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयमसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समिती निहाय मुर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी.
                   विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल. दस-याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावन दहनासाठी आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर राहावे. प्रेषक बोलावू नये. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणव्दारे पाहण्याची व्यवस्था करावी. कोविड-19 या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य, पर्यवरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर पालीका, नगर पंचायत, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्येक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून आणखी काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close