बनसारोळा येथील मयत सुनीता दिनकर गोरमाळी ( वय २१ ) या महिलेचा दिनकर गोरमाळी याच्यासोबत १० फेब्रुवारी २०१९ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना पहिली मुलगी झाली. त्यांनतर तुला पहिलीच मुलगी झाली व माहेरहून दुचाकी घेण्यासाठी ३० हजार रुपये घेऊन ये असे म्हणत सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून सुनीता हिने २९ मार्च रोजी सकाळी दहा वाजता गावातील कुंडलिक शंकर गोरे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सुनीताचे वडील पांडुरंग कचरू दुधाळ ( रा. हिवरसिंगा ता. शिरूर कासार ) यांच्या फिर्यादीवरून पती दिनकर गोरमाळी, सासू मंदोदरी गोरमाळी, सासरा सावत गोरमाळी यांच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.