क्राइम
मोबाईल लोकेशन च्या आधारे आरोपीच्या आवळल्या मुसक्या……!

केज दि.9 – पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात कार्यरत असलेले जवान सोमेश गोरख धस (रा.सांगवी ता.केज) हे गावाकडे सुट्टीवर आलेले असताना ते व त्यांची पत्नी हे दोघे स्कुटी वरून जात असताना 9 ऑगस्ट रोजी रात्री 8.15 वा. त्यांना केज – बीड रोडवरील सावंतवाडी पाटी टोल नाक्या जवळ तीन चोरट्यांनी मोटरसायकल आडवी लावून मारहाण केली. तसेच गळ्यातील सोने, मोबाईल व रोख रक्कम पळविली असल्याची घटना घडली होती. सदरील घटनेचा माग पोलिसांनी काढला असून आरोपी ताब्यात घेतला आहे.
दरम्यान या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जोंधळे यांनी त्या ठिकाणचे मोबाईल लोकेशन आधारे माळेगाव येथून दिनेश उर्फ दिन्या नागनाथ काळे रा. मोहा ता कळंब जि उस्मानाबाद याला ताब्यात घेतले आहे. तपासात त्याच्या कडून गुन्ह्यातील रिअलमी कंपनीचा मोबाईल हस्तगत केला. या तपासकामी पोलीस कर्मचारी दुबाले, गायकवाड, पवार व ठोंबरे यांनी सहभाग घेतला.