राजकीय
महाराष्ट्र बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवा – बाळासाहेब ठोंबरे

केज दि. 9 – लखीमपूर (उत्तरप्रदेश) येथे शेतकऱ्यांना निर्दयीपणे चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. केज तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन केज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे यांनी यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. येत्या ११ ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा पाठीशी काँग्रेस पक्ष नेहमीच उभा राहिला आहे. त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. तालुक्यातील काँग्रेस पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन बाळासाहेब ठोंबरे यांनी केले आहे.