#Social
खा.रजनीताई पाटील यांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट…….!
केज दि.१० – जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी कारवाया सतत सुरू असून मागच्या काही दिवसांपूर्वी येथील नायदखाइ बांदीपोरा मोहम्मद शाफ़ी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचे निधन झाले होते.
पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार जम्मू काश्मीर च्या प्रभारी खा.रजनीताई पाटील यांनी मोहम्मद शाफी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटूंबाचे सांत्वन केले.व कांग्रेस पक्ष सतत आतंकवादाच्या विरोधात असून यापुढेही पीडित लोकांच्या मागे पक्ष खंबीरपणे उभा आहे अशी भावना त्यांनी यावेळी कुटुंबातील व्यक्तींना बोलताना व्यक्त केली.