#निधन वार्ता
केज शहर शिवसेना प्रमुख अनिल बडे यांचे निधन…….!

केज दि.११ – मागच्या 30 वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून परिचित असलेले अनिल बडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ते 51 वर्षांचे होते.
अनिल बडे हे पूर्वीपासून शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जात.सध्या ते केज शहर प्रमुख म्हणून काम करत होते. आज दि.११ रोजी बीडच्या एका खाजगी दवाखान्यात रात्री हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. अण्णा म्हणून परिचित असलेले बडे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी दि.12 रोजी त्यांच्यावर क्रांतीनगर स्मशानभूमीत सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती केज तालुका शिवसेना प्रमुख रत्नाकर शिंदे यांनी दिली.