#Vaccination

लहान मुलांच्या लसीकरणाला मंजुरी……!

नवी दिल्ली दि.12 – कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे.याला मंजुरी देखील देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. ही भारतीय बनावटीची लस आहे. कोरोना विषाणूविरूद्ध क्लिनिकल चाचण्यांमध्ये Covaxin जवळजवळ 78 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

                    केंद्र सरकारकडून लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. त्यानंतरच मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना प्रौढांप्रमाणे Covaxin लसीचे दोन डोस दिले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लसीचा मुलांवर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचं समोर आलं आहे. सूत्रांच्या मते, ज्या मुलांना दमा वगैरे समस्या आहेत त्यांचे लसीकरण हे आधी करण्यात येऊ शकते. ही लस सरकारी ठिकाणी मोफत दिली जाईल.मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी दिल्याने ही खूप दिलासा देणारी बाब ठरली आहे. कारण कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक त्रास होईल असे म्हटले जात आहे. परंतु जर त्यापूर्वी मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळू लागली तर संसर्ग कमी होण्याची शक्यता अधिक आहे. डॉक्टर नरेश त्रेहान यांच्या मते, प्रौढांप्रमाणेच मुलांचे देखील लसीकरण केले पाहिजे. याचा अर्थ असा की, त्यातही अशा मुलांना आधी कोरोना लस द्यावी ज्यांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. त्रेहान असेही म्हणाले की, जर मुलांना कोरोनाची लस मिळाली तर शाळा पूर्णपणे उघडणे सोपे होईल, पालक आणि मुलांमधील कोरोनाची भीती देखील कमी होईल.

            दरम्यान, भारतात सध्या 18 वर्षावरील वयाच्या लोकांना कोरोना लस दिली जात आहे. यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक या कोरोना प्रतिबंधात्मक लस दिल्या जात आहेत. भारतात आतापर्यंत 95 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close