#Social
सर्व विवाहित जोडप्याची विवाह नोंदणी होणे गरजेचे……!!!
बीड दि.13 – 12 ऑक्टोबर रोजी पंचायत समिती सभागृह बीड येथे ग्रामविकास अधिकारी यांच्या सोबत कोरो महिला संपत्ती अधिकार मोहीम, एकल महिला संघटना व पंचायत समिती बीड च्या संयुक्त विद्यमाने विवाह नोंदणी संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गटविकास अधिकारी ए.डी.सानप, विस्तार अधिकारी मोरे ए. एस. यांनी मार्गदर्शन केले. यावेळी के.बी. शेळके विस्तार अधिकारी बीड उपस्थित होते. एका ग्रामपंचायत चा 100 कुटूंबाचा सर्वे करण्यात आला त्याची सद्यस्थिती सांगण्यात आली. त्यानुसार खूप कमी विवाह नोंदणी झाल्याचे दिसून आले. तसेच विवाह नोंदणी केल्यास महिलांना सासरच्या संपत्तीत अधिकार मिळण्यास सोपे होईल, बालविवाह कमी होतील, यामुळे कमी वयात लादले जाणारे मातृत्व लादले जाणार नाही, विवाह नोंदणी केली तर आरोग्य विषयक लाभ मिळण्यास मदत होईल, नोंदणी केली तर त्यांना ईतर कागदपत्रे काढण्यास हा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर करण्यासाठी उपलब्ध होईल इत्यादी विषयावर चर्चा केली.
दरम्यान, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत ला विवाह नोंदणी चे माहीती व लागणारे कागदपत्रे याची माहिती लावण्यात येईल. तर मोठया प्रमाणात विवाह नोंदणी करण्यासाठी जनजागृती करू तसेच बीड तालुक्यातील विवाहित जोडप्याचे नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही सांगितले. यावेळी सर्व तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुक्मिणी नागापुरे यांनी केले.