बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा…….!
नाशिक दि.१६ – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर केलं. मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागने व्यक्त केली आहे.
राज्यात या वर्षी 4 महिने 9 दिवस पाऊस कोसळला. मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाची वाट नागरिक पाहत होते. राज्यात निर्धारीत वेळेच्या पाच दिवस आधीच मान्सूनचे आगमन झालं होतं. आता मात्र पावसाने चार दिवस मुक्काम ठोकत गुरूवारी अखेर पावसाने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात मंगळवारी आणि बुधवारी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या दहा जिल्ह्यातं येलो अलर्ट जारी केला आहे. त्याठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या 48 तासात ओडिशा राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याचा फटका मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहवे, असं हवामान विभागाकडून सांगितलं आहे.