#Social
एक महिन्यापासून लाईट बंद; दोन दिवसांत सुरू न झाल्यास २३ ला रस्ता रोको….… !

केज दि.२० – तालुक्यातील सारणी (आ) येथील मागील एक महिन्यापासून थ्री फेज लाईट बंद आहे अतिवृष्टीमुळे काही पोल पडले मात्र महावितरण कडून अनेक वेळा विनंती करूनही हे पोल दुरुस्ती झाले नाहीत यामुळे २२ तारखेपर्यंत लाईट सुरळीत न झाल्यास २३ तारखेला कुबेफळ येथे सारणी ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
१२ सप्टेंबर ला अतिवृष्टी झाली व यामध्ये जवळबन सब स्टेशन वरून सारणीला वीज पुरवठा करणारे विजेचे खांब पडले म्हणून लाईट बंद आहे. मात्र या ठिकाणी रस्ता नसल्याचे कारण महावितरण च्या अधिकाऱ्यांनी सांगून अद्यापही ही लाईट दुरुस्ती केली नाही. गावकऱ्यांनी अनेक वेळा विनंती केली. आम्ही सर्व गावकरी यासाठी तुम्हाला मदत करतोत असेही सांगितले, तरी देखील लाईट सुरू केली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी शेवटी बुधवारी केज तहसीलदार यांना भेटून याबाबत निवेदन दिले. दोन दिवसांत लाईट सुरळीत न झाल्यास सर्व गावकरी मिळून केज अंबाजोगाई या राज्य रस्त्यावर २३ तारखेला सकाळी ११ वाजता रस्ता रोको करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवणे, प्रशांत सोनवणे, प्रकाश सोनवणे, अनंत सोनवणे, अशोक गायकवाड, अर्जुन सोनवणे, मधुकर सोनवणे, बालासाहेब सोनवणे, युवराज गायकवाड, सुंदर गोरे, गोविंद गायकवाड, सतिश सोनवणे, सोपान सोनवणे, शिवाजी खरात, परमेश्वर सोनवणे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.