
केज दि.२० – तालुक्यातील येवता रोड वरील लहुरी शिवारात एका धाब्यावर पत्र्याच्या शेड मध्ये बेकायदेशीर रित्या विक्री करण्यासाठी ठेवलेली दारू पकडली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येवता लहुरी रोडवरील लहुरी शिवारात राहुल सर्जेराव चाळक रा.लहुरी हा बेकायदेशीर रित्या दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार केज डीवायएसपी कार्यालयाचे पोलीस कर्मचारी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी दि.२० रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान सदर ठिकाणी धाड टाकली असता तिथे एका पत्र्याच्या शेडमध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या ज्याची किंमत २२१० रुपये आहे.
दरम्यान सदरील दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून पोलीस कर्मचारी बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून राहुल चाळक याच्या विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना श्री. सोनवणे हे करत आहेत.