केज दि.२१ – तालुक्यातील दैठणा येथे अज्ञात व्यतीने एका ३८ वर्षीय तरुणाचे प्रेत आढळून आले होते. मात्र सदरील खून बापानेच केला असल्याची कबुली बापाने दिली आहे.
दि. २० ऑक्टोबर बुधवार रोजी केज तालुक्यातील दैठणा येथे विलास चंद्रकांत मुळे या ३८ वर्षाच्या विवाहित तरुणाचा अज्ञात व्यतीने अज्ञान कारणासाठी खून करून प्रेत शाळे जवळून स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात टाकल्याची घटना निदर्शनास अली होती.तर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सविता नेरकर, केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, एपीआय शंकर वाघमोडे, पीएसआय दादासाहेब सिद्धे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली होती.
दरम्यान, नातेवाईका सोबत भांडणं करण्याच्या रागातून चंद्रकांत उद्धव मुळे याने वैतागून धारदार शस्त्र डोक्यात मारून खून केल्याची कबुली दिली आहे.