क्राइम
२५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग……!

केज दि.२१ – तुझा मुलगा आमच्या शेतात का आला ? असे म्हणून दोन भावांनी एका २५ वर्षीय महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.
केज तालुक्यातील भिमराव साहेबराव आंधळे व दत्ता साहेबराव आंधळे यांनी एका २५ वर्षीय विवाहित महिलेस तुझा मुलगा आमच्या शेतात का आला असे म्हणून भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच वाईट हेतूने गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेच्या पतीने त्यांना जाब विचारला असता शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून भिमराव साहेबराव आंधळे व दत्ता साहेबराव आंधळे यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.