#निधन वार्ता
केज तालुक्यातील एका शाळेवरील शिक्षकाची आत्महत्या……!
अंबाजोगाई दि.२४ – येथील योगेश्वरी नगरी मधील रेवती अपार्टमेंटमध्ये राहणा-या मनोज वाघ या तरुण शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सदरील आत्महत्या नेमकी कोणत्या करणातून केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मनोज वाघ हे केज येथील एका मुकबधीर मुलांच्या खाजगी शिक्षण संस्थेत 2008 पासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र सदरील शाळा मार्च 2020 पासून कांही तांत्रिक बाबींमुळे बंद असल्याने व पगार बंद असल्याने आर्थिक विवंचनेतही असल्याची चर्चा आहे. त्यातच मनोज वाघ यांच्या पत्नीनेही कांही दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. मनोज यांची पत्नीही अंबाजोगाई येथील एका खाजगी संस्थेत नौकरीस होती. मात्र पत्नीने आत्महत्या केल्यामुळे मनोज हा पुर्ण डिप्रेशन मध्ये गेला होता असे बोलल्या जाते. शेवटी आज दुपारी त्याने रेणुका मंदीराशेजारील शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान याच संस्थेतील हरणमारे नावाच्या शिक्षकाचे हृदयविकाराने निधन झाले होते. व त्यांच्या पत्नीने पगार बंद असल्याने ते तणावात होते असा पोलीसांत जबाब दिला होता. मनोज वाघ याचे पश्चात्य दोन मुले, आई वडील, विवाहीत भाऊ, बहीण असा परीवार आहे. मनोज वाघ यांच्या निधनाबद्दल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.