#Social
पत्रकार पांडुरंग केंद्रे यांना डॉ.अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार……!!!

केज दि. 24 – भारतरत्न डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त ड्रीम फाऊंडेशन व चाणक्य गुरुकुल यांच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आरोग्य युवा जागृती ग्रामीण विकास क्रिडा व पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत असलेल्या भरीव योगदानाबद्दल डॉ.अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार पत्रकार पांडुरंग केंद्रे यांना प्रदान करण्यात आला आहे.
IAS मा डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपमहासंचालक यशदा पुणे व अतुल कुलकर्णी IPS अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुधारगृह महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी बसवराज बिराजदार कृषी सहसंचालक पुणे, संजय लाड लोकप्रिय वक्ते मुंबई, रविंद्र टापरे उद्योजक पुणे, डॉ. सचिन मांजरेकर, प्रविण जाधव महानिरीक्षक पुणे, अक्कलकोटे शंकरराव पुणे, अमोल उंबरजे महाएनजिओ फेडरेशन, सुधा कांकरिया बेटी बचाओ अभियान अहमदनगर, पुण्यनगरी संपादक विठ्ठल क्षिरसागर, सदानंद घुले, आकाश केंद्रे बीड व ड्रीम फाऊंडेशन संचालक काशिनाथ भतगुणकी तसेच सचिव संगिता भतगुणकी व चाणक्य गुरुकुल आदी मान्यवर उपस्थित होते.