क्राइम
तिर्रट खेळणारे नऊ जण पकडले ; ७ लाख १८ हजाराचा मुद्देमाल जप्त, तर 86 हजारांचा गुटखाही पकडला…….!
केज दि.२६ – येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोखंडी सावरगाव ( ता. अंबाजोगाई ) येथील एका पत्याच्या क्लबवर छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या दहा जणांना पकडले. त्यांच्याकडून ७ लाख १८ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुटखा विक्री करणाऱ्या परळी येथील स्नेह नगर भागातील एका व्यापाऱ्याच्या घराची झडती घेऊन केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत व त्यांचे सहकारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास केजकडे येत असताना लोखंडी सावरगावपासून लातुरकडे जाणाऱ्या टि पॉईंटवरील तिरुपती ट्रेनिंग कंपनीचे पाठीमागे एका बंद रुममध्ये भीमराव साखरे हे पत्याचा क्लब चालवीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार कुमावत व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा मारला असता गणेश महादेव जगदाळे, मिलींद वसंत खरात, श्रीराम मधुकर केकाण, मकरंद शाहुराव पवार, बालासाहेब सुखदेव गालफाडे, विशाल युवराज कजबे, मुकेश अरुण हजारे, राजाराम माणिक लांडगे, विष्णु काशिनाथ काळे हे नऊ जण तिर्रट नावाचा जुगार खेळताना पकडले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह ७ लाख १८ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. क्लब मालक भिमराव साखरे, गणेश जगदाळे, मिलींद खरात, श्रीराम केकाण, मकरंद पवार, बालासाहेब गालफाडे, विशाल कजबे, मुकेश हजारे, राजाराम लांडगे, विष्णु काळे या दहा जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक आर राजा, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत, जमादार बालाजी दराडे, बाबसाहेब बांगर, महादेव सातपुते , रामहारी भांडाणे, विकास चोपणे, राजु वंजारे, मधुकर तांदळे, सचिन अंहकारे, संतोष राठोड, मपोना मनीषा चाटे यांनी केली आहे.
८६ हजाराचा गुटखा पकडला
केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत व त्यांच्या सहकाऱ्यांनी धारूर येथील आकाश कंन्फेशनरी दुकानावर छापा मारून ८६ हजार ३३८ रुपयांचा गोवा नावाचा गुटखा जप्त केला. ताब्यात घेतलेल्या आकाश तिवारी याने परळीच्या व्यापाऱ्यांकडून गुटखा आणल्याची माहिती दिली. सदर व्यापाऱ्याच्या घरी छापा मारून बाबा नावाचा गुटखा जप्त केला. गुटखा विक्री करणाऱ्या आकाश तिवारी, सोहेल तांबोळी ( दोघे रा. धारुर ) या दोघांविरुद्ध धारूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.