क्राइम

दोघा भावांचे भांडणे, सोडविण्यास आलेल्या चौघांनी केली मारहाण 

केज शहरातील घटना

दोघा भावांचे भांडणे, सोडविण्यास आलेल्या चौघांनी केली मारहाण

प्रतिनिधी / केज

दोन भावात बाचाबाची सुरू असताना आलेल्या चौघांनी तुम्ही भांडणे का करता असे म्हणत लाथाबुक्याने, दगडाने मारहाण केली. यात एकाचे डोके फुटले असून ही घटना केज शहरातील सिद्धार्थ नगरमध्ये पाच जून रोजी रात्री सात वाजता घडली. याप्रकरणी चौघाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

केज शहरातील सिद्धार्थ नगर भागातील अनिल सोनाजी दुनघव ( वय ३८ ) व त्यांचा भाऊ यांच्यात किरकोळ कारणावरून पाच जून रोजी रात्री सात वाजता बाचाबाची सुरू होती. याचवेळी जमीर हबीब शेख, नजू हबीब शेख, शडू नावाचा व्यक्ती, अहमद मिस्तरी ( सर्व रा. प्यादे गल्ली, केज ) हे तिथे आले. त्यांनी भांडणे का करता असे म्हणत अनिल दुनघव यास लाथाबुक्याने मारहाण करीत शिवीगाळ केली. तर शडू नावाच्या व्यक्तीने दगड डोक्यात मारून दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिली. अनिल दुनघव यास येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अंबाजोगाईला पाठविण्यात आले. तेथून उपचार घेऊन आल्यानंतर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार श्रीराम काळे हे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, जमीर हबीब शेख ( रा. अजीजपुरा, केज ) यांनी अनिल दुनघव याच्या भावाने फोन करून बोलावून घेतल्यावरून घटनास्थळी गेलो. त्यांचे आपसात भांडण सुरू असल्याने सोडवत असताना अनिल दुनघव, त्यांचे दोन मेव्हणे, इतर अनोळखी एक अशा चौघांनी हातावर लाकडाने व लाथाबुक्याने मारहाण केल्याची तक्रार दिल्यावरून अनिल दुनघव व इतर तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close