#Vaccination
विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे – प्राचार्य डी.जी.निकाळजे……!!!
बीड दि.28 – तुलसी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड येथे दि. 30 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते 3 या वेळेत मिशन युवा स्वास्थ अंतर्गत कोविड19 लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजन च्या माध्यमातून हे लसीकरण राबवले जाणार असून या मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लसीकरण करावे असे आवाहन प्राचार्य डी.जी.निकाळजे, आयोजक भाग्यविधाता साळवे,प्रकाश ढोकणे, संजय धुरंधरे यांनी केले आहे.
अद्याप पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना लसीकरण केले नाही व ज्यांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मिशन युवा स्वास्थ अंतर्गत कोविड19 लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मदतीने तुलसी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड येथे दि. 30 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते 3 या वेळेत मिशन युवा स्वास्थ कोविड19 लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. लसीकरण करता वेळी आधार कार्ड आणि मोबाईल जवळ असणे आवश्यक आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लसीकरण करावे असे आवाहन प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी केले आहे.