#निधन वार्ता
केजचे नामांकित डॉ. प्रवीण पैठणकर यांचे निधन……!

केज दि.30 – मागच्या कित्येक वर्षांपासून तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांची सेवा करणारे डॉ.प्रवीण किशनराव पैठणकर यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे.
केज शहरातील कानडी रोडवर गुरुकृपा नावाने क्लिनिक चालवणारे डॉ.प्रवीण पैठणकर यांचे दि.30 रोजी दुपारी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी निधन झाल्याचे वृत्त आहे. सर्वसामान्य रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान, मागच्याच कांही महिन्यांपूर्वी त्यांच्या संजय नावाच्या बंधूचेही निधन झाले होते.