बीड दि.30 – मागच्या महिन्यापासून केज व परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याने अनेकांनी आपला गाशा गुंडाळला आहे. वारंवार धाडसत्र सुरू असून गुन्हेगार सैरावैरा झाले आहेत. त्यातच आज पुन्हा एका ठिकाणी एएसपी पंकज कुमावत यांनी धाड टाकून बेकायदेशीर बायोडिझेल विक्री करणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दिनांक 30 रोजी संध्याकाळी सात ते साडेसात वाजता मांजरसुंबा येथील काटेवाडी मामा धाबा येथे विनापरवाना बेकायदेशीर बायोडिझेल विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून स्वतः पंकज कुमावत व त्यांच्या स्टाफने सदर ठिकाणी छापा मारला असता बायो डिझेल पंप व डिझेल टॅंक साहित्य मिळून आल्याने पुरवठा विभागाचे अधिकारी यांना बोलावून घेत पंचनामा केला व एकास ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पंकज कुमावत यांच्यासह पीएसआय श्री. माने, एएसआय शेषराव यादव, बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, युवराज भूम्बे, राम हरी भंडारे यांनी केली.