#Social
खा.डॉ. प्रितम मुंडे यांची लव्हूरी येथील बुध्द विहाराला भेट…….!!!
डी डी बनसोडे
October 31, 2021
केज दि.31 – खा.प्रितम मुंडे यांच्या हस्ते विडा जि.प. सर्कल मधील विविध कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.या
उद्धघाटन निमीत्ताने लव्हूरी येथे खा.प्रितम मुंडे आल्यानंतर येथील उपसरपंच दिपक कांबळे यांच्या विनंतीला मान देऊन येथील बुध्द विहाराला भेट देऊन महामानवांना वंदन करत येथील बुध्दविहाराची स्तुती केली.
भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या विडा जिल्हा परिषद सर्कल मध्ये माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सत्तेतील कार्यकाळात विडासर्कल मध्ये दिलेल्या विकास कामांचा उद्घाटन कार्यक्रम सोहळा दि. २९ ऑक्टोंबर रोजी खा.प्रितम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवण्यात आला होता.दि.२९ ऑक्टोंबर शुक्रवार रोजी सकाळी लव्हूरी येथील उद्धघाटन कार्यक्रमासाठी खा. मुंडे या नियोजित वेळेवर उपस्थित होत्या.त्यांच्या हस्ते रोडवरील उद्धघाटन व गावातील विविध कामांचे उद्धघाटन झाल्यानंतर लव्हूरीचे उपसरपंच तथा रिपाइंचे केज तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांनी खा. मुंडे यांना लव्हूरी येथील भिमनगर भागातील बुध्द विहारात आयोजित केलेल्या सत्काराला येण्याची विनंती केली.
दरम्यान, दिपक कांबळे यांच्या विनंतीवरून खा. मुंडे,आ.नमिता मुंदडा यांचं भिमनगर कडे आगमन होताच फटाक्यांच्या आतशबाजी व ढोल ताशांच्या गजराने त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी येथील बुध्द विहारातील गौतम बुध्द व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीना वंदन केल्यानंतर खा. मुंडे यांचा दिपक कांबळे यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला यावेळी मुंडे यांनी येथील बुध्दविहाराच्या कामाचे कौतुक केले.यावेळी रोहित कांबळे, बाळासाहेब कांबळे,सुमित कांबळे,सुशिल कांबळे,रवि गायसमुद्रे,गणेश वाघमारे, अन्वर शेख,साबुद्दीन शेख सलीम शेख,यांनी परीश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.