क्राइम
तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड……!!!

वडवणी – १३ वर्षीय मुलीला किराणा दुकानात बोलावून बलत्कार केल्याची घटना वडवणी तालुक्यात घडली असून पोलीसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहत. तर पिडित मुलीची व कुंटुबियांची माजलगांव विभागीय पोलीस आधिकारी जायभाय यांनी भेट घेतली आहे.
वडवणी पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, वडवणी तालुक्यातील एका गावातील गणेश संदिपान गोंडे (वय २० वर्षे) याचे गावात किराणा दुकान आहे. तेथूनच काही अंतरावर असणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला गोड बोलावून तिला चाकुचा धाक दाखवत तिच्यावर बळजबरीने बलत्कार केला. पिडित मुलीच्या चुलतीच्या फिर्यादी-वरुन आरोपी गणेश संदिपान गोंडे याच्यावर कलम ३७६ प्रमाणे अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि बाल लैंगिक अत्यचार प्रतिबंधक कायदा आणि ऍट्रॉसिटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अवघ्या काही तासातच वडवणी पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, आज सकाळी माजलगांवचे उप-विभागीय पोलीस अधिकारी जायभाये यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सदरील घटनेमुळे तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.