केज दि.२ – हायवा टिप्पर क्रमांक MH २४ AU १५५० यामध्ये पिंपळगाव तालुका गेवराई येथून गोदावरी नदीतून विनापरवाना वाळू भरून केज येथे येत असल्याच्या माहितीवरून एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने सदरचे टिप्पर मस्साजोग येथे ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन केज येथे लावण्यात आले.
सदरील टिप्पर चालक यास विचारणा केली असता त्याने पिंपळगाव माळस तालुका गेवराई असे सांगितले. त्यानुसार पोलीस टीमने माळस पिंपळगाव, राक्षसभुवन इत्यादी ठिकाणी रात्री २.३० वाजता छापा मारला. सदर ठिकाणी किनी च्या साहाय्याने नदीतून बाहेर काढलेले वाळूचे ढिगारे मिळून आल्याने जिल्हाधिकारी यांना कळून मंडळाधिकारी, तहसीलदार गेवराई यांनी कारवाई करून मोठा साठा जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पंकज कुमावत, सपोनि मिसळे, पीएसआय माने, पोलीस अंमलदार बालाजी दराडे, बांगर, स्वप्ने, सातपुते, भंडारे, अहंकारे लोखंडे, बहिरवाल, यादव, भम्बे यांनी केली.