
केज दि.३ – एका ३२ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत घरातील पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील पैठण ( सा. ) ३ नोव्हेंबर रोजी घडली. अशोक मेघराज चौधरी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पैठण ( सा. ) येथील अशोक मेघराज चौधरी ( वय ३२ ) या तरुणाने २ नोव्हेंबर रात्री घरातील नातेवाईक झोपी गेल्यावर मध्यरात्री दारूच्या नशेत घराच्या पत्र्याच्या लोखंडी आडूला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, पोलीस नाईक परमेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. वैजनाथ नानासाहेब चौधरी यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे पुढील तपास करत आहेत.