#Social
पालावरच्या माणसांची दिवाळी केली गोड……!
केज दि. ४ – ‘मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, दीप लावू अनाथांच्या उशाला रोज राती झोपताना” या ओळी सार्थ करत केज येथील शिक्षकांनी केज बीड रस्त्यालगतच्या पालात हलाकीचं जीवन जगणाऱ्या तीस कुटुंबांना फराळाचे साहित्य वाटप केले.
संबंधित ग्रुपने गुरुवार रोजी निधी एकत्र करून सर्व गोड पदार्थ पॅकिंग करून प्रति कुटंबास भेट दिले.यावेळी पालात लहान मुलांच्या हस्ते पणती चा उजेड केला. ग्रुप सदस्य जी. बी. गदळे, हनुमंत घाडगे, युवराज हिरवे,व्ही. एम यादव, प्रा डॉ. बाबासाहेब हिरवे, हनुमंत भोसले, किशोर भालेराव, महादेव ढाकणे, राहुल काकनाळे, विक्रम डोईफोडे जनार्धन सोनवणे, प्रा. डॉ. काशीद, डॉ. हनुमंत सौदागर आदींनी सहभागी होऊन पालावरील माणसांची दिवाळी गोड केली. यावेळी कुटुंबातील लहान बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.