#Social
वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा……!

पुणे दि.१२ – एस.टी.कर्मचाऱ्यांचा राज्यभर चालू असलेल्या ‘विलीणीकरणाच्या लढ्यात’ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. या अनुषंगाने आज पुणे शहरातील स्वारगेट आगार येथे संपावर असलेल्या आंदोलकांशी संवाद साधून कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार एसटी कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष विजय प्रधान, सचिव विशाल सरवदे, सहसंघटक अजित सुरते, सदस्य दत्ता मोहिते हे उपस्थित होते.